Full Width(True/False)

ड्रग्जच्या प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार?

मुंबई: अभिनेता मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचे समोर आल्याने एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत एनसीबीच्या विशेष पथकाने सुशांतसिंहची मैत्रिण तसेच सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका मोठ्या कंपनीची अधिकारी जया शाह, यांच्या चौकशीत सिनेतारकांची नावे समोर आली होती. त्यावरून 'एनसीबी'ने अभिनेत्री दीपिका पदुकोन, , श्रद्धा कपूर व राकूलप्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. दरम्यान, या चौकशीत सारा अली खान हिनं अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे केल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि सुशांत 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिलेशनशिपमध्ये होते, असं तिनं चौकशीदरम्यान कबुल केलं आहे. त्यामुळं साराचे वडिल म्हणजेच अभिनेता काहीसा नाराज असल्याचं समजतं. साराची एनसीबीकडून चौकशी सुरू असताना सैफ मात्र दिल्लीला रवाना झाला होता. त्यामुळं तर्कवितर्क लावले जात आहेत. सैफ , करिना आणि तैमूर सध्या पतौडी पॅलेस इथं गेल्याची माहिती आहे. साराची पुन्हा चौकशी? अमली पदार्थांसंबंधी आणखी सिनेतारकांना समन्स पाठवला जाणार नाही, असं नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने ( ) स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात चारही अभिनेत्रींची पुरेशी चौकशी झाली आहे, असंही 'एनसीबी'चे म्हणणं आहे. 'चारही अभिनेत्रींची पुरेशी चौकशी झाली आहे. अभिनेत्रींनी दिलेली काही उत्तरे संशयास्पद होती. पण तरीहीदेखील कोणाचीही अतिरिक्त चौकशी होणार नाही. चारही अभिनेत्रींना पुन्हा किंवा अन्य सिनेतारकांना समन्स पाठविण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही', असं 'एनसीबी'नं निवेदनात स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या प्रकरणात 'एनसीबी'नं आतापर्यंत १८ जणांची चौकशी केली आहे. त्यामध्ये रिया-शौविक चक्रवर्ती, सुशांतसिंहचा माजी व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडासह सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर काही दलालांचीही छापे टाकून धरपकड करण्यात आली आहे, असंही 'एनसीबी'नं स्पष्ट केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cA4g4i