Full Width(True/False)

सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर तब्बल २६ हजार रुपयांची सूट

नवी दिल्लीः सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S10+ वर आज बंपर सूट दिली जात आहे. अॅमेझॉन इंडियावर डील ऑफ द डे ऑफर अंतर्गत या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या फोनवर २६,००१ रुपयांची सूट दिली जात आहे. या सूट नंतर फोनची किंमत ७९ हजार रुपयांऐवजी ५२ हजार ९९९ रुपये झाली आहे. कंपनीचा फोन आकर्षक नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकतो. नो कॉस्ट ईएमआयची सुरुवात २४९५ रुपये प्रति महिना आहे. वाचाः फोनला जर एक्सचेंज ऑफर अंतर्गत खेरदी करायचे असेल तर तुम्हाला १२ हजार ५० रुपयांचा फायदा होऊ शकतो. एचएसबीसी बँकेच्या कॅशबॅक कार्डवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना ५ टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. कंपनी अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वरून शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के फ्लॅट डिस्काउंट देत आहे. वाचाः सॅमसंग Galaxy S10 चे फीचर्स सॅमसंग Galaxy S10 मध्ये 3040x1440 पिक्सल रिझॉल्यूशनसोबत ६.१ इंचाचा डायनामिक अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये सॅमसंगचा ऑक्टा-कोर Exynos 9820 प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो ४ जी सीमच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक दोन १२ मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी यात १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4100mAh बॅटरी दिली आहे. सॅमसंगचा हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतो. हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो. या फोनवर दिलेली ऑफर केवळ आजच्या दिवसांसाठीच आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bIZtgp