Full Width(True/False)

परेश रावल झाले नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवे चेअरमन

नवी दिल्ली- प्रसिद्ध अभिनेते आणि नेता यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी यासंबंधीची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली. भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीचा कार्यभार स्वीकारतील. परेश रावल यांच्याआधी राजस्थानी कवी अर्जुन देव चरण हे एनएसडीच्या चेअरमनपदी होते. २०१८ मध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सोशल मीडियावर परेश यांच्या नियुक्तीची माहिती दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'प्रख्यात कलाकार माननीय परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे. देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचा फायदा होईल. हार्दिक अभिनंदन.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m6RwGA