Full Width(True/False)

'सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे आतापर्यंत हाती आले नाहीत'

मुंबईः अभिनेता मृत्यू प्रकरणी सीबीआय, ईडी आणि नार्कोटिक्स ब्युरोकडून चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणी आता सीबीआय अधिकाऱ्यांकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. सुशांतसिंहची हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत तरी कुठलेही पुरावे हाती आले नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. इंडिया टुडे हे वृत्त दिलं आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे. सुशांतसिंह याचा मृत्यू १४ जूनला झाला होता. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा भाग असलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आतापर्यंत तरी त्याची हत्या झाल्याचे पुरावे मिळाले नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आता त्याच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू आहे. सुशांतसिंह याने आत्महत्या केली त्याला आत्महत्येसाठी प्रोत्साहित केलं गेलं, या दृष्टीकोनातून आता तपास सुरू असल्याचं अधिकारी म्हणाले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या पथकाने त्याच्या वांद्रे येथील घरी जाऊन तपास केला. तसंच मुंबई पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांची पडताळणी केली. या प्रकरणी सीबीआयकडून सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी केली गेली. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीही चौकशी करण्यात आलीय. फॉरेन्सिक रिपोर्ट, प्रमुख संशयितांचे जबाब आणि घटनास्थळाची तपासणी केल्यावर सुशांतसिंह याची हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात कुठेचे निदर्शनास आले नाही, असं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामुळे आता सीबीआय सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीकोनातून तपास करत आहे. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सुशांतचा पोस्टमार्टम आणि अटोप्सी रिपोर्टवर आधारित आहे. आता एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार तपास करण्यात येत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/350ymvM