Full Width(True/False)

दयाबेन गोकुलधाम सोडून बिग बॉसच्या घरात?

मुंबई:बऱ्याच प्रतीक्षेनंतरही अभिनेत्री , अर्थात दयाबेन ''मध्ये परतली नाही. पण, लवकरच ती ''च्या घरामध्ये दिसणार असल्याचं कळतंय. लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा चौदावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री दिशा वकानीची. बिग बॉसकडून दिशाला शोमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रण मिळालं आहे. परंतु, दिशानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान,‘ ’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली. त्यात दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीनं प्रसूती रजेनंतर या मालिकेचा निरोप घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेपासून दूर असलेली अर्थात पुन्हा एकदा मालिकेत झळकणार की नाही हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात होतं. आता यावर खुद्द मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मौन सोडत मोठं विधान केलं होतं.मालिकेच्या निर्मात्यांनी दिलेल्या मुलाखतीत दिशा वकानी हिच्या कमबॅकवर मोठाखुलासा केला होता. गोकुळधाममधला जेठालाल, गरबाक्वीन दयाबेन, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, 'दुनिया हिला दूंगा' म्हणणारा पत्रकार पोपटलाल, खोडकर टप्पू, अय्यर, डॉ. हाथी, सोढी ही सगळी पात्रं आज प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहेत. पण मालिका कोणत्याही एका कलाकारामुळं यशस्वी होत नाही त्यामुळं संपूर्ण टीम मेहनत घेत असते, अशी प्रतिक्रिया असितकुमार मोदी यांनी दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या कमबॅकवर दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lAdh1g