Full Width(True/False)

मर्डरचे पुरावे नाहीत आता 'या' ॲंगलने होणार सुशांतच्या मृत्यूचा तपास

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत असून त्यांना देखील काही ठोस पुरावे मिळाले नसल्याची माहिती आहे. सुशांतचा मृत्यू त्यानं आत्महत्या केल्यामुळं झाला, की त्याची हत्या करण्यात आली होती, याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा भाग असलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आतापर्यंत तरी त्याची हत्या झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळं आता या प्रकरणाचा आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू आहे. सुशांतसिंह याने आत्महत्या केली त्याला आत्महत्येसाठी प्रोत्साहित केलं गेलं, या दृष्टीकोनातून आता तपास सुरू असल्याचं अधिकारी सांगितलं आहे. सुशांतचा मृत्यू १४ जूनला झाला होता. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणी सीबीआयच्या पथकानं त्याच्या वांद्रे येथील घरी जाऊन तपास केला. तसंच मुंबई पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांची पडताळणी केली. या प्रकरणी सीबीआयकडून सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी केली गेली. अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड हिची देखीस चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट, प्रमुख संशयितांचे जबाब आणि घटनास्थळाची तपासणी केल्यावर सुशांतसिंह याची हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात कुठेचे निदर्शनास आले नाही, असं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामुळं आता सीबीआय सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीकोनातून तपास करत आहे. दरम्यान, या प्रकरणात रिया चक्रवर्तीनंतर आता तिच्या आई- वडिलांचीही चौकशी केली जात आहे. व्यतिरिक्त नारकोटिक्स ब्युरोही या प्रकरणात ड्रग अँगलनं चौकशी करत आहे. सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स या तिघांच्या चौकशीत नवीन गोष्टी समोर येत आहेत. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, ड्रग्ज अँगलमध्ये त चार मोठी नावं यात सामिल असल्याचं बोललं जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत प्रकरणात अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणीत चार मोठी नावं गुंतलेली आहेत. यात मुंबईतील दोन नेते, एक टीव्ही अभिनेता आणि एक सिनेनिर्माता यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना या प्रकरणाचा तपास करत आहे. रिया चक्रवर्तीनं याआधी तिनं कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं म्हटलं. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की सुशांतला गांजा ओढायची सवय होती. या व्यतिरिक्त रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, 'रियानं कधीही अमली पदार्थ घेतले नाही. तसेच रिया यासंबंधीची चाचणी करायलाही तयार आहे.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YWWxaZ