मुंबई :हॉलिवूडचा यावर्षी सर्वात जास्त कमाई करणारा सुपरस्टार डे्वन जॉन्सन, ज्याला आपण 'द रॉक'च्या नावानं ओळखतो त्याचा आगामी 'ब्लॅक अॅडम' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आलाय. ड्वेनच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. ड्वेन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खास बाब ही आहे की, ड्वेनची या सिनेमातील भूमिका थोडी नकारात्मक आहे. याची झलक या टिझरमध्ये बघायला मिळतेय. सोबतच या सिनेमातील त्याच्या लूकचीही चर्चा जोरदार सुरू आहे. पाहा ट्रेलर 'ब्लॅक अॅडम' चित्रपटाचं दिग्दर्शन जाउमे कोलेट सेरानं केलं आहे. तर सिनेमाची निर्मिती ड्वेन जॉन्सन यानं स्वत: केली आहे. हा सिनेमा २२ डिसेंबर २०२१ ला रिलीज केला जाणार आहे. ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉकचे फॅन्स जगभरात आहेत. करोनाचा काळ मनोरंजनविश्वासाठी कठीण असताना ड्वेनच्या या नव्या भूमिकेनं फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद येऊ शकतो. पण, त्यासाठी त्यांना पुढच्या डिसेंबरची वाट मात्र बघावी लागेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QL45J9