मुंबई- प्रकरणाच्या कनेक्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. चौकशीदरम्यान रियाने अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतल्याचं म्हटलं जात आहे. रियाने पार्टीत अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या जवळपास २५ सेलिब्रिटींची नावं घेतली. यात अभिनेत्री सारा अली खानच्या नावाचाही समावेश आहे. या सगळ्या गदारोळात सुशांतचा ड्रायव्हर समोर आला असून त्यानेही सुशांत आणि साराच्या नात्यावर भाष्य केलं आहे. सुशांतचा ड्रायव्हर धीरेंद्र यादव याचीही सीबीआयने चौकशी केली. धीरेंद्रने यापूर्वीही अनेक माध्यमांशी सुशांतसंबंधी चर्चा केली आहे. आताही अशाच एका वृत्तवाहिनीशी बोलताना धीरेंद्र म्हणाला की त्याने सुशांतबरोबर ऑक्टोबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत काम केलं. सुशांत आणि सारा फार जवळचे मित्र असल्याचं सुशांतच्या ड्रायव्हरने सांगितलं. सारा कधीही सुशांतच्या घरी गेली होती का असा प्रश्न जेव्हा धीरेंद्रला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, ती कधीही त्याच्या घरी गेली नव्हती. दोघेही ‘केदारनाथ’ च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात गेले होते. त्या काळात ते एकत्रच प्रवास करायचे. सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडानेही यापूर्वी सांगितलं होतं की सुशांत आणि सारा जानेवारी २०१९ मध्ये थायलंडच्या सहलीला गेले होते. थायलंड सहलीच्या प्रश्नावर ड्रायव्हरने सांगितलं की 'ट्रिपहून आल्यानंतर मॅडम त्यांच्यासोबत नव्हती.' त्यांची थायलंडची ट्रीप कदाचित १० दिवसांची होती. तेव्हा सोनचिरिया सिनेमा प्रदर्शित झाला होता. यानंतर मी रजेवर गेलो. सुशांतच्या ड्रग्ज घेण्यावर ड्रायव्हरला प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की, जोवर मी कामावर होतो तेव्हा कोणीही ड्रग्ज घ्यायचं नाही. सर्वांचं वेळापत्रक ठरलेलं होतं. आम्ही एकत्रच शूटवर जायचो. सुशांत अनेकदा टेनिस, क्रिकेट आणि इतर खेळ खेळायचा. मात्र सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यापासून सुशांतचं कुटुंबासोबतचं नातं बिघडू लागलं असंही ड्रायव्हर म्हणाला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FBmyFF