मुंबई- अमली पदार्थ प्रकरणात कन्नड सिनेअभिनेत्री रागिणी द्विवेदीसह, संजना गलराणी, रविशंकर, राहुल, नियाज आणि लोम पेपर सांबा यांना १४ सप्टेंबरपर्यंत ताब्यात घेण्यात आलं आहे. अटकेपूर्वी सीसीबीने रागिनीच्या घरावर छापा टाकला होता. मिळालेल्या वृत्तानुसार ड्रग्ज पॅडलिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या रागिनीने जाणीवपूर्वक तिच्या यूरिनमध्ये पाणी घालून ड्रग्ज टेस्टमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. वृत्तानुसार, रागिणीची गुरुवारी बेंगळुरूच्या केसी जनरल इस्पितळात टेस्ट करण्यात आली. यूरिन टेस्टमधून समजलं जातं की गेल्या काही दिवसांत त्या व्यक्तीने कोणत्या अमली पदार्थाचं सेवन केलं आहे. पण जर यूरिनमध्ये पाणी मिसळल्यासं योग्य तो रिपोर्ट येत नाही. या सर्व गोष्टी उघड झाल्यानंतर सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी रागिनीचं वागणं लज्जास्पद आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं. असं म्हटलं जातं की, जेव्ही यूरिनचं सॅम्पल डॉक्टरांकडे गेलं तेव्हा डॉक्टरांना लगेच त्यात पाणी मिसळल्याचं कळून आलं. यानंतर रागिणीची पुन्हा एकदा यूरिन टेस्ट करण्यात आली. यावेळी रागिणी चाचणीमध्ये कोणतीही कुरघोडी करणा नाही याची काळजी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या (सीसीबी) अधिकाऱ्यांनी घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल पुरावे मिटवण्यासाठी रागिणीने तिच्या मोबाइलमधले सर्व मेसेज डिलीट केले. पण सीसीबी अधिकारी डेटा मिळविण्यात यशस्वी झाले. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. रविशंकर (रागिणी द्विवेदीचा जवळील व्यक्ती) आणि प्रशांत रांका या दोन आरोपींमधील रेकॉर्ड अधिकाऱ्यांना सापडले आहेत. गेल्या आठवड्यात द्विवेदीला ताब्यात घेण्यात आले होते. तिच्या अटकेच्या अगोदर, पोलिसांनी गुरुवारी हाय-प्रोफाइल पार्टीचा आयोजक वीरन खन्नासोबतच्या तिच्या कथित संबंधामुळे रागिणीच्या घरीही छापा मारण्यात आला होता. रागिणी द्विवेदीचा जन्म बेंगळुरू येथे झाला होता. तर तिचं कुटुंब हरियाणाच्या रेवाडी येथील आहे. २००९ मध्ये 'वीरा मदाकारी' या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिला केम्पे गौडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा सारख्या सिनेमांमधून प्रसिद्धी मिळाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35yroPg