मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाची पायरी चढली आहे. तिने अमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी माध्यमांनी न चालवण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. यापूर्वीही रकुलप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे सांगितलं होतं. रकुलप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना स्पष्ट केलं की, मीडियाने तिच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी किंवा लेख प्रसिद्ध करू नये किंवा वृत्तवाहिनीवर दाखवू नये याची ताकीद न्यायालयाने द्यावी. यापूर्वी, रकुलप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात तिने अमली पदार्थांशी संबंधी प्रकरणाच्या चौकशीत सारा अली खान आणि सिमोन खंबाटाच्या नावासोबत तिचंही नाव आलं होतं. यासंबंधीच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यांवर रोख लावण्यासाठीही रकुलने दिल्ली उच्च न्यायालयाची पायरी चढली होती. दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी रकुलप्रीत सिंगची चौकशी केली. सूत्रांनी सांगितलं की, अभिनेत्रीने रियासोबत ड्रग्ज चॅट केल्याचं मान्य केलं. पण यासोबतच तिने अमली पदार्थाचं सेवन न केल्याचंही म्हटलं. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता एनसीबीच्या अतिथीगृहात पोहोचलेल्या रकुलप्रीतची ब्युरोच्या एसआयटी टीमने सुमारे चार तास चौकशी केली होती. रकुलप्रीतचं नाव रिया चक्रवर्तीच्या जबाबात समोर आलं होतं. रकुलनेही आजच्या चौकशीत ड्रग्ज चॅटचं संपूर्ण खापर रियावर फोडलं. रियाचं अमली पदार्थांचं सेवन करायची आणि चॅटमध्येही मी याचाच उल्लेख केला असल्याचं रकुल म्हणाली. रियाचं जे सामान माझ्या घरी होतं तेच मी तिला घेऊन जायला चॅटमध्ये सांगत होते, असं स्पष्टीकरण रकुलने यावेळी दिलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cE7Ji7