Full Width(True/False)

चौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका, अधिकाऱ्यांना पडला नाही फरक

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगलच्या तपासणीत एनसीबी सक्रिय आहे. या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये आधीच आलं आहे. तर अनेकांची नावं अजूनही बाहेर येणं बाकी आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) , सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची स्वतंत्रपणे चौकशी केली गेली. दीपिका सकाळी १० वाजता एनसीबीच्या गेस्ट हाउसवर चौकशीसाठी पोहोचली होती. पाच तासांहून जास्त चाललेल्या या चौकशीत दीपिका तीन वेळा रडल्याचं म्हटलं जातं. दीपिका तीन वेळा रडली, पण अधिकाऱ्यांना पडला नाही फरक दीपिका पादुकोणची एनसीबीचे पाच अधिकारी चौकशी करत होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दीपिका चौकशीदरम्यान अनेकदा भावुक झाली आणि रडली. मात्र अधिकाऱ्यांनी तिला कोणत्याही प्रकारचे ‘इमोशनल कार्ड’ अर्थात भावनिक खेळ न खेळण्यास सांगितलं. यानंतर दीपिकाने ड्रग्ज चॅट तिचेच असल्याचं मान्य केलं. या चॅटमध्ये ती मॅनेजर करिश्मा प्रकाशकडे ड्रग्जची मागणी करत आहे. असं असलं तरी तिने संपूर्ण चौकशीत ड्रग्ज घेतल्याला नकार दिला. अधिकाऱ्यांनी दीपिकाचा फोन केला सील दरम्यान, दीपिका पादुकोणचा फोनही आता अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पुरावा अधिनियमांतर्गत दीपिका, करिश्मा, रकुल आणि सिमोन खंबाटा यांचे फोन एनसीबीने हस्तगत केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी दीपिका थांबली हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री दीपिका गोव्याहून मुंबईला परतली. तिच्यासोबत तिचा नवरा रणवीर सिंगही होता. गोव्यात दीपिका शकुन बत्राच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत होती. गोव्याहून मुंबईत परतल्यावर दीपिकाने घरी न जाता एनसीबी कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये राहणं पसंत केलं. माध्यमांचा त्रास टाळण्यासाठी आणि वेळेत एनसीबीपर्यंत पोहोचण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. सारा आणि श्रद्धा यांनीही ड्रग्ज घेण्यास नकार दिला या प्रकरणात दीपिकाशिवाय सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी करण्यात आली होती. सारा आणि श्रद्धा दोघींनीही ड्रग्स घेण्यास नकार दिला. श्रद्धाने सांगितले की ती सुशांतसोबत पार्टी करायची. त्याचबरोबर पार्टीत ड्रग्ज नसून फक्त ड्रिंक्स दिले जायचे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i2HEdD