Full Width(True/False)

बाबांना दिला त्रास, रियाने मीडियाविरोधात दाखल केली तक्रार

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची सीबीआयची टीम चौकशी करत आहेत. सीबीआयने सोमवारी सलग चौथ्या दिवशी रियाची चौकशी केली आणि तिला मंगळवारी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला. त्याचवेळी रियाने तिच्या बिल्डिंगमध्ये जमल्याबद्दल मीडियाविरोधात तक्रार दाखल केली आहे. रिया म्हणाली - माध्यम त्यांच्या मार्गात अडथळा ठरू नये मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या बिल्डिंगमध्ये जमलेल्या मीडियाविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. मीडिया त्यांच्या मार्गात अडथळा असल्याचं ती म्हणाली. यासोबतच मीडियाने घटनात्मक हक्कांनुसार वागण्याचंही तिने सांगितलं. रियाने शेअर केला होता व्हिडिओ रिया चक्रवर्तीने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, तिच्या वडिलांना बिल्डिंगमध्ये मीडिया कर्मचार्‍यांनी वेढले होते. यासोबतच रियाचे वडील जसे पुढे जात होते तसे मीडिया कर्मचारी त्यांच्या मागे लागत असल्याचं दिसून आलं. यासोबतच रियाने तिच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या जीवाना धोका असल्याचंही म्हटलं होतं. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणं, पैशांची फसवणूक करणं, कुटूंबापासून दूर जाणं यासह रियावर त्याने अनेक गंभीर आरोप केले होते. १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. यापूर्वी मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32MhnKW