Full Width(True/False)

कॉन्ट्रॅक्टमुळे कॅन्सरनंतरही संजयने सुरू ठेवलं शूटिंग?

मुंबई- कर्करोगासारख्या गंभीर आजाराने न जुमानता अभिनेता संजय दत्तने नुकताच आपल्या आगामी ‘’ सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. कर्करोगापेक्षाही कामाला प्राधान्य देणाऱ्यांमध्ये संजय हा काही पहिलाच कलाकार नाही. याआधी दिग्दर्शक अनुराग बासू आणि अभिनेता इरफान खान यांसारख्या नामांकित कलाकारांनी कर्करोगाच्यावेळी उपचार घेत असताना आपलं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. पण या सर्व गोष्टी सिनेमांसाठीची आवड होती म्हणून केल्या गेल्या की कराराच्या सक्तीमुळे करण्यात आल्या याबद्दल जाणून घेऊ.. मीडिया रिपोर्टनुसार संजय दत्तने आपल्या केमोथेरपीची पहिली फेरी पूर्ण केली आहे आणि दुसर्‍या फेरीच्या आधी त्याने ‘शमशेरा’ सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं. संजय सुरुवातीला उपचारांसाठी अमेरिकेत जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण नंतर त्याची पत्नी मान्यता दत्तने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केलं की संजय यापुढील उपचार मुंबईतच घेणार आहे. रुक जाना नहीं तू कहीं हार के सूत्रांच्या माहितीनुसार संजय दत्तने 'शमशेरा' सिनेमाचं दीड दिवसांचं शूट पूर्ण केलं. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये पूर्ण करण्यात आलेल्या सिनेमाचं ते रॅप-अप शूट होतं. शूटिंगमध्ये संजयचं उरलेलं पॅचवर्कचं काम पूर्ण करण्यात आलं. शूटवर तो एकटाच होता. पॅचवर्कनंतर हा सिनेमा पूर्ण झाला असून आता करण मल्होत्रा निर्मित आणि रणबीर कपूर, वाणी कपूर स्टारर या सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शनवर का सुरू झालं आहे. मान्यता दत्तची भावुक पोस्ट दोन दिवसांपूर्वी संजय दत्तची पत्नी मान्यताने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली होती. त्यात मान्यताने लिहिले की, ''रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। आपल्याला आयुष्यात चांगले दिवस परत आणण्यासाठी वाईट दिवसांविरुद्ध संघर्ष करावा लागेल.' त्याच दिवशी संजू बाबा यशराज स्टुडिओच्या बाहेर दिसला होता. येथेच त्याने 'शमशेरा' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. करार नाही, नुकसान होण्याची जास्त चिंता कर्करोगासारख्या आजाराशी लढणाऱ्या कलाकारांना काम करण्यास भाग पाडलं जाईल का हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावर बोलताना सिनेव्यापार विश्लेषक कोमल नाहाटा म्हणाले की, 'नाही, अशा आजाराच्या वेळी करार फारसा विचारात घेतला जात नाही.' याउलट अशावेळी निर्मात्यांचं नुकसान होईल याचीच चिंता कलाकारांना असते. सिनेमावर कोट्यवधींचा पैसा लागलेला असतो. अशा परिस्थितीत आपला आजार बाजूला ठेवून संजू बाबाने सिनेमा याचसाठी पूर्ण केला की निर्माते आणि ड्रिस्टिब्युटरचा पैसा अडकू नये. यावर आपलं मत व्यक्त करताना सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श म्हणाले की, 'सिनेसृष्टीत करारापेक्षा मानवतेला अधिक महत्त्व दिलं जातं. कलाकारांना स्वतःचे अपूर्ण सिनेमे पूर्ण करायचे असतात. पूर्वी मीना कुमारी, संजीव कुमार यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी गंभीर आजार असूनही त्यांच्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. संजय स्वत: निर्माताही आहे. त्याला अभिनयाची आवड आहे. म्हणूनच आजारी असूनही त्याने कलाकाराच्या धर्माचं पालन केलं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ke0Ruo