मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते यांच्या घशावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या '' इस्पितळात असून त्यांनी आपल्या आजाराबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पहिले तीन दिवस खूप कठीण होते ईटाइम्स टीव्हीशी खास बातचीत करताना घनश्याम नायक म्हणाले, 'मला आता बरं वाटलं आहे. मालाड येथील पॉइन्टर इस्पितळात मला दाखल करण्यात आले आहे. सात तारखेला शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास चार दिवसांनंतर मी पहिल्यांदा जेवलो. शस्त्रक्रियेनंतरचे पहिले तीन दिवस खूप कठीण होते. पण आता मला बरं वाटत आहे आणि आता मी पुढचा विचार करत आहे. घशातून आठ गाठी काढण्यात आल्या घनश्याम नायक यांच्या घशात गाठी झाल्या होत्या. त्या त्वरित काढणं आवश्यक होतं. ते म्हणाले की, 'आठ गाठी काढून टाकल्या आणि खरं सांगायचं तर मलाही माहीत नाही की या गाठी कशा झाल्या. त्या गाठी पुढील चाचण्यांसाठी पाठवल्या गेल्या आहेत. माझा देवावर विश्वास आहे, तो जे काही करेल चांगलंच असेल.' घनश्याम नायक यांनी सांगितले की त्यांची शस्त्रक्रिया जवळपास दोन तास चालली होती. सेटवर प्रत्येकजणपाहत आहेत त्यांची वाट 'नट्टू काका' म्हणाले की, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या अनेक कलाकारांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. अनेकजण त्यांची सेटवर वाट पाहत आहेत. या सगळ्यात डॉक्टरांनी त्यांना जवळपास एक महिना घरी आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळेच नवरात्रीच्याआधी तरी ते शूटिंगला जाणार नसल्याचं म्हणाले. मुलगा आणि मुलगी घेत आहेत काळजी सध्या इस्पितळात त्यांची दोन मुलं त्यांची काळजी घेत आहेत. घनश्याम यांच्यासोबत त्यांचा मुलगा रात्री इस्पितळात राहतो तर मुलगी दिवसरभर वडिलांची देखभाल करण्यासाठी इस्पितळात राहते. यावेळी घनश्याम नायक यांनी डॉक्टरांच्या टीमचेही कौतुक केले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hsdBfl