Full Width(True/False)

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील अभिनेत्री डेम डायना रिग्स यांचं निधन

मुंबई ''मधील ओलेना टायरेल ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारलेल्या अभिनेत्री यांचं वयाच्या ८२व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांनी दिली. डेम डायना रिग्स यांना कर्करोग असल्याचं मार्चमध्ये निदान झालं होतं. 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील हाऊस ऑफ टायरेलच्या ओलेना टायरेल हे पात्र डेम डायना रिग्स यांनी इतक्या प्रभावीपणे साकारलं होतं की त्याचं कौतुक झालं. त्याचबरोबर 'मिसेस जेम्स बाँड' ठरणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनाविषयी रॅचल सांगतात की, 'माझ्या आईचं निधन झोपेतच झालं. आई शेवटच्या काही महिन्यात फार उत्साही आणि आनंदी होती. तिनं आम्हा सर्वांवर मनापासून प्रेम केलं. तिची इच्छा होती की, आयुष्याचा शेवटचा काळ कुटुंबियांसोबत आणि घरीच व्यतीत व्हावा'. डेम डायना रिग्स यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं कुटुंब भारतात स्थायिक झालं होतं. नंतर शालेय शिक्षणासाठी त्या इंग्लडमध्ये गेल्या. पुढे डेम यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्टमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी १९५९ रॉयल शेक्सपियर कंपनीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zv0L9L