Full Width(True/False)

'सैराट' साराख्या चित्रपटांसाठी विचारणा व्हावी'

बहुतांश कलाकार आज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. पण, कलाकारांनी सतत सोशल मीडियावर असणं, याची अभिनेत्री हिला गरज वाटत नाही. तिच्याशी झालेल्या गप्पा. हिंदी, मराठी, तमिळ चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री अदिती पोहनकरला मोजकं; पण लक्षात राहील असं काम करणं महत्त्वाचं वाटतं. 'शी' या वेबसीरीजनंतर ती नुकतीच '' या सीरिजमध्ये दिसली. नाजूक चणीची सुंदर मुलगी अशी ओळख असताना भूमिकेसाठी स्वतःला कुस्तीपटू म्हणून तयार करण्याचं आव्हान तिनं स्वीकारलं आणि प्रसिद्ध कुस्तीपटू संग्राम सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेत स्वतःला तयारही केलं. 'लय भारी' या मराठी चित्रपटापासून खऱ्या अर्थानं तुझा प्रवास सुरू झाला. उत्तम कमाई करणारा चित्रपट देऊनही तू नंतर फार चित्रपटांमध्ये दिसली नाहीस?-मी सुरुवातीपासूनच निवडक काम करण्याला प्राधान्य दिलं. मराठी, तमिळ हिंदी चित्रपट केले आणि अलिकडे सीरिज केल्या, त्या भूमिका आवडल्या म्हणून. या प्रवासात काय नाकारायचं, ते शिकले. चित्रपटाचं काम नसतानाही गाणं, नृत्य, त्यांचा रियाज यात मी रमते. मराठीत पुन्हा केव्हा दिसणार आहेस?- मातृभाषा हे नेहमीच माझं पहिलं प्राधान्य आहे. मात्र, भूमिकाही तशा मिळायल्या हव्यात. 'एक हजाराची नोट', 'सैराट' यासारख्या चित्रपटांसाठी विचारणा व्हावी, असं वाटतं. मी निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानं आता पुढेही चांगल्या भूमिका आणि दिग्दर्शक हे समीकरण जुळण्याची वाट पाहतेय. वेब सीरीजमधल्या तुझ्या तडफदार भूमिकांचं कौतुक होतंय. अभिनयालाही वाव देईल, असं काम तुला मिळालं. नाजूक, सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या मुलीसाठी 'आश्रम'मधली कुस्तीपटू म्हणून प्रशिक्षण घेणं कितपत कठीण होतं?- या माध्यमातही चांगल्या भूमिकांसाठी विचारणा होतेय, हे महत्त्वाचं. भूमिकेसाठी शारीरीक आणि मानसिक तयारी भरपूर होती. भाषेचा लहेजा शिकले. जवळपास तीन महिने संग्राम सिंग यांच्याकडून कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. शरीर तयार करण्यासाठी मनानं खंबीर असावं लागतं. कस पाहणारं प्रशिक्षण होत. पण, दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दाखवलेल्या विश्वासानं ते साध्य झालं. नऊ किलो वजन वाढवून मी ही कुस्तीपटू साकारली. प्रकाश झा, बॉबी देओल यांच्यासह काम करताना त्यांच्या अनुभवी असण्याचं, आधीच्या कामाचं कितपत दडपण होतं?- दिग्दर्शक म्हणून झा यांची आधी थोडी भीती होती. पण तुझ्या पद्धतीनं तू काम कर, असं सांगून त्यांनी आश्वस्त केलं. बॉबी हा माणूस म्हणून खूप उत्तम आहे. मी मकरंद देशपांडेंबरोबर रंगभूमीवर काम केलं आहे. ही गोष्ट त्याला माहीत होती. संवादांची तालीम करणं असो किंवा सेटवर वावरणं, त्याचा कसलाच बडेजाव नाही. तो अतिशय उत्स्फूर्त आहे. गेले काही महिने कलाकारांना अस्वस्थ करणारे ठरले. तुझा अनुभव?- मी या काळात काही ना काही करत होतेच. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी अयोध्येत आधीच्या सीरिजचं काम केलं. पुढे मग या सीरिजसाठी फिजिकल फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. मी कुठल्याही बातम्या पाहत नाही. आवश्यक तेवढी माहिती असेल, हा कटाक्ष असतो. मात्र, सगळ्या नकारात्मकतेपासून आणि सोशल मीडियापासून स्वतःला वाचवण्यात यशस्वी ठरले. तुला घरातून शास्त्रीय संगीताचा वारसा आहे. गाणं शिकताना त्याचं काही दडपण असतं का?- पं. अजय पोहनकर हे माझे काका. काका गात असतो ते ऐकणंही खूप काही शिकवणारं. अचानक देस राग गाऊयात, असं तो सांगतो. मग मैफल रंगते. घरी पं. बिरजू महाराज, झाकीर हुसेन साहेब येतात, तेव्हा त्यांच्या चर्चा ऐकणंही समृद्ध करणारं असतं. या दिग्गजांना पाहायला मिळणंही नशीबाचा भाग आहे, असं वाटतं. गाणं शिकताना आपसूकच मनाला एक शांती मिळते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3houPtR