Full Width(True/False)

लेकीच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये म्हणून काजोलनं उचललं 'हे' पाऊल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रत्येक भूमिका जीव ओतून करते. तिच्या अभ्यासू वृत्तीसाठी ती किती प्रसिद्ध आहे सगळे जाणतातच. पण, यावेळी किस्सा आहे तो तिच्या मुलीच्या म्हणजे न्यासाच्या अभ्यासाबाबतचा. मुलीच्या अभ्यासाकडेही तिचं तेवढंच लक्ष असतं. काहीही झालं, तरी मुलांचं अभ्यासाचं नुकसान होऊ नये म्हणून ती दक्ष असते. त्याचं झालं असं, की लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी काजोल सिंगापूरला जाऊन न्यासाला भारतात घेऊन आली. कारण, भारताबरोबरच परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाउन असल्यामुळे न्यासाचं कॉलेजही बंदच होतं. लॉकडाउनच्या काळात काहीही काम झालं नाही. त्यामुळे गेले काही महिने काजोल परिवारासह घरीच वेळ घालवत होती. पण, आता न्यासाचं कॉलेज लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे तिला तिथे जाणं आवश्यक होतं. मग अभ्यास महत्त्वाच्या असल्यानं काजोलनं तिला तिथे पाठवायचं ठरवलं. फक्त तेवढंच नव्हे तर काजोल स्वत:देखील न्यासासह सिंगापूरला रवाना झाली आहे. तिचा अभ्यास बुडू नये आणि सध्याच्या कठीण परिस्थितीत परदेशात ती एकटी पडू नये म्हणून काजोल तिच्यासोबत सिंगापूरला गेली आहे. त्यामुळे सध्या ती मुलीबरोबर सिंगापूरमध्ये आहे तर मुलासह मुंबईत आहे. त्यामुळे दोघंही आपापल्या परीनं मुलांकडे लक्ष देत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3blsrTg