मुंबई :बॉलिवूडचा खिलडी यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये यानं त्याला हत्तीच्या विष्ठेपासून तयार केलेल्या चहाविषयी सांगितलं आहे. '' शोच्या पुढील भागामध्ये अक्षय जंगलात रोमांचक साहस करताना दिसणार आहे. अक्षयनं या भागातील एक नवीन प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो हत्तींच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाचा आस्वाद घेताना दिसतो. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या नव्या प्रोमोमध्ये अक्षय दोरीच्या मदतीने नदी पार करत असताना दिसतो. मात्र, त्या नदीमध्ये महाभयंकर मगरी आहेत. शोमध्ये भरपूर स्टंट्स असल्याचं प्रोमोतून लक्षात येते. चालत्या ट्रकमधून दोघेही जंगलात उडी मारताना दिसता. अक्षय म्हणतो, 'मी रिल हिरो आहे, आणि बेयर ग्रील्स रिअल हिरो आहे.' कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व्ह येथे या विशेष भागाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या शोमध्ये गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील यात दिसले होते. आता खिलाडीकुमारदेखील या शोमध्ये हजेरी लावणार आहे. अक्षय कुमारनं नुकताच त्याच्या सोशल मीडियावर 'इनटू द वाइल्ड'च्या आगामी भागाचा टीझर शेअर केला आहे. 'तुम्हाला असे वाटत असेल की मी वेडा आहे. पण केवळ वेडे लोकच जंगलात जात असतात' असं त्यानं म्हटलं आहे. अक्षय दिसणारा हा भाग कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jAUUYa