Full Width(True/False)

नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, ड्रग्ज चॅटमध्ये अडकला

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीने आतापर्यंत अनेक ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. अजूनही या प्रकरणात बरीच मोठी नावं उघडकीस येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक केली. यादरम्यान त्यांची चौकशी केली असता अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली. यानंतर तपास यंत्रणेने बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरविणारी साखळी तोडण्याचा निश्चय केला आहे. सारा अली खान, दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर या सेलिब्रिटींच्या नावानंतर बॉलिवूड निर्माता यांचं नावही समोर आलं. प्रकरणात तो अडकताना दिसत आहे. ड्रग्ज चॅटमध्ये नक्की काय उघड झालं- मधू मंटेनाचेही आता ड्रग्ज चॅट समोर आले आहेत. यात तो जया साहाकडे वीडची मागणी करत आहे. त्याच्या मागणीला प्रतिसाद देताना जयाने वीड पाठवायला होकार दिला होता. आज मधूची चौकशी करत आहे. मधू आणि जया यांना समोरासमोर बसवून ही चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मधू आणि जया दोघंही क्वान कंपनीशी संबंधीत आहेत. कोण आहे मधु मंटेना- सिनेनिर्माता वर्मा याने हिंदी, तेलगू आणि बंगाली या भाषांतील सिनेमांची निर्मिती आणि वितरण केले आहे. २००८ मध्ये मधूने आमिर खान स्टारर फिल्म ‘गजनी’ या सिनेमाची सहनिर्मिती केली होती. हा सिनेमा तेव्हाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. यानंतर त्याने रक्तचरित्र आणि ऑटोग्राफसारख्या सिनेमांची निर्मिती केली. आता ड्रग्ज चॅट प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर त्याला बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. केली या हिट सिनेमांची निर्मिती मधू मंटेना फॅंटम फिल्म्सचा सह-संस्थापक आहे. या कंपनीने लुटेरा, हंसी तो फंसी, बॉम्बे वेल्वेट, अगली आणि क्वीन यांसारख्या बॉलीवूड सिनेमांची निर्मिती केली. स्वतंत्र निर्माता म्हणून उडता पंजाब, रमण राघव २.०, सुपर ३०, ट्रॅप्ड, हायजॅक, मनमर्जिया, शानदार आणि हंटर या सिनेमांचीही निर्मिती त्याने केली आहे. यांच्या मुलीशी झालं होतं लग्न मधूने अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताशी लग्न केलं होतं. मात्तर गेल्या वर्षी २०१९ मध्ये दोघं वेगळे झाले. मसाबाला घटस्फोट देण्यापूर्वी मधू अभिनेत्री नंदना सेनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने स्वत:चं संगीत लेबल तयार केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35ZJbyJ