मुंबई :काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या '' या चित्रपटाच्या नावावर आता एक नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती होणार असून, पाच भाषांमध्ये होणारा 'चोरीचा मामला' हा पहिला मराठी चित्रपट ठरणार असल्याचं अभिनेता-दिग्दर्शक यानं 'मुंटा'ला सांगितलं. सोशल मीडियावर यानं 'चोरीचा मामला'च्या सर्व मुख्य कलाकारांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे मराठीत 'चोरीचा मामला २'वर देखील काम सुरू झालं असल्याचं कळतंय. यात पहिल्या भागात दिसलेले हे सर्व कलाकार दिसतील हे कळत असून त्यांच्याबरोबर नवीन कुणी कलाकार दिसणार का? याची मात्र अजून उत्सुकता आहे. प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात , , हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट होती. एक प्रामाणिक चोर एका बंगल्यात चोरी करायला गेल्यावर कसा अडकत जातो याची धमाल गोष्ट या चित्रपटात होती. गुंतवणून ठेवणारी पटकथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटानं प्रेक्षकांची दाद मिळवली. आता मराठीची सीमा ओलांडून पाच वेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट असल्याची चर्चा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RwV337