मुंबई टाइम्स टीम प्रत्येक चित्रपटाचं एक नशीब असतं. कुठला चित्रपट चालेल, कुठला आपटेल हे सांगणं महाकठीण. पण, जो चित्रपट सोडला तोच पुढे सुपरहिट झालेला पाहिला की कलाकारांना चुकचुकल्यासारखं होत असेल. इंडस्ट्रीत अशी अनेक उदाहरणं आहेत. दिल धडकने दो : झोया अख्तरचा 'दिल धडकने दो' हा मल्टीस्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नसला, तरी समीक्षकांनी मात्र या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. या चित्रपटासाठी अभिनेता आणि अभिनेत्रींची निवड करताना अनेक वाद झाले होते. प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, अनुष्का शर्मा आणि शेफाली शाह यांच्या भूमिकेसाठी , रणबीर कपूर, दीपिका पडुकोण आणि रवीना टंडन यांना आधी विचारणा झाली होती. कभी अलविदा ना कहना : शाहरुख आणि राणी मुखर्जी यांच्या 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटात आधी आणि काजोल ही जोडी झळकणार होती. मुन्नाभाई एमबीबीएस : संजय दत्तच्या करिअरमधील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरला तो 'मुन्नाभाई एमबीबीएस'. पण, तुम्हाला माहीत नसेल दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेची ऑफर आधी शाहरुख खानला दिली होती. अभिनेत्री ग्रेसी सिंहच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय-बच्चन, तब्बू आणि राणी मुखर्जी यांना विचारण्यात आलं होतं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : बॉलिवूडचा किंग, अर्थात शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा ठरलेला आणि सुपरडुपर हिट ठरलेला चित्रपट आहे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'. शाहरुखकडे येण्याआधी या चित्रपटाचा प्रस्ताव सैफ अली खानला पाठवण्यात आला होता. हम तुम : अभिनेता सैफ अली खानचा 'हम तुम' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण, या चित्रपटासाठी सैफ अली खानची निवड होण्यापूर्वी अभिनेता हृतिक रोशनसमोर 'हम तुम'चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्यानं हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. कुछ कुछ होता है - 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. राणी मुखर्जीनं साकारलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. ही गाजलेली भूमिका करण्यासाठी यापूर्वी ऐश्वर्या राय-बच्चन, ट्विंकल खन्ना, तब्बू, उर्मिला मातोंडकर आणि रवीना टंडन यांनी नकार दिला होता. : शाहरूख खानच्या फिल्मी करिअरला कलाटणी देणारा चित्रपट म्हणजे 'बाजीगर'. या चित्रपटातील विकी मल्होत्राच्या भूमिकेसाठी आधी अभिनेता सलमान खानला विचारण्यात आलं होतं. पण, 'ग्रे शेड' असलेली भूमिका असल्यानं सलमाननं हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. विकी कौशल : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण, तुम्हाला माहीत आहे का? अभिनेता शाहिद कपूरनं साकारलेल्या भूमिकेसाठी विकी कौशलला पहिल्यांदा विचारण्यात आलं होतं. मात्र वैयक्तिक कारण देत ही भूमिका त्यानं नाकारली होती. प्रियांका चोप्रा : सलमान खानची मुख्य भूमिका असलेला 'किक' चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस भाव खाऊन गेली होती. मात्र जॅकलिनच्या आधी निर्माता साजीद नाडियादवालाची पसंती होती प्रियांका चोप्रा आणि दीपिका पडुकोण यांना. परंतु, अगोदरच्या एका चित्रपटाच्या करारामुळे प्रियांकाच्या हातून 'किक' चित्रपट गेल्याची चर्चा होती. करीना कपूर : ज्या चित्रपटानं हृतिक रोशन व अमिषा पटेल यांना एका रात्रीत स्टार बनवले, तो 'कहो ना प्यार है' हा चित्रपट करिना कपूरनं साईनही केला होता. पण, काही दिवस चित्रीकरण केल्यानंतर अचानक तिनं हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि हा सिनेमा अमिशा पटेलला मिळाला. अजय देवगण : १९९५मध्ये आलेला सलमान आणि शाहरुखचा 'करण अर्जुन' हा चित्रपट सुपरडुपरहिट ठरला होता. या चित्रपटामधली अर्जुनची भूमिका आधी अजयला ऑफर झाली होती. पण, अजयनं यासाठी नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी शाहरुखची निवड करण्यात आली. : आमिरच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेला 'थ्री इडियट्स' आधी शाहरुख खानला ऑफर करण्यात आला होता. पण, त्यानं नकार दिल्यानंतर चित्रपटातील रँचोची भूमिका आमिर खाननं साकारली. हृतिक रोशन : 'स्वदेस' हा चित्रपट शाहरुख खानच्या आधी हृतिक रोशनला ऑफर करण्यात आला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hYY4UC