मुंबई- दोन वर्षांपूर्वी जगभरात सुरू झालेल्या मीटू आंदोलनात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावंही समोर आली होती. त्यावेळी दिग्दर्शक साजिद खानवर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आता मॉडेल पॉलने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलताना पॉल म्हणाली की, ती जेव्हा १७ वर्षांची होते तेव्हा साजिद खानने तिला त्याच्यासमोरच कपडे काढायला सांगितले. पॉलने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून या घटनेचा खुलासा केला. पॉलने लिहिले की, चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा बर्याच लोकांनी साजिद खानच्या विरोधात भाष्य केलं होतं. पण तेव्हा मला धैर्य दाखवता आलं नाही. कारण इतर कलाकारांप्रमाणेच माझ्यावरही कोणाचा वरदहस्त नाही. मला कुटुंबासाठी पैसे कमवायचे होते. त्यामुळे मी शांत बसले. आता मी माझ्या पालकांसोबत राहत नाही. स्वतःसाठी कमावते.' 'आता मी धैर्य दाखवू शकले आणि हे सांगू इच्छिते की मी १७ वर्षांची असताना साजिद खानने माझं यौन-शोषण केलं. तो माझ्याशी घाणेरडा बोलायचा. त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. हाऊसफुल सिनेमात भूमिका देण्यासाठी त्याने मला त्याच्यासमोरच कपडे काढायला सांगितले. त्याने किती मुलींसोबत हे केलं असेल हे फक्त देवालाच ठाऊक आहे.' मॉडेलने पुढे लिहिलं की' 'या सर्वाचा माझ्यावर किती वाईट परिणाम झाला हे फक्त मला कळले आहे. मी त्यावेळी लहान होतो, मला बोलता येत नव्हतं. कास्टिंग काउचमधून लोकांना भुरळ घालण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर नेण्यासाठी साजिद खानला तुरुंगवास व्हावा.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FvBGUY