नवी दिल्लीः सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे दोन प्रसिद्ध स्मार्टफोन आणि च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्टनुसार, किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर गॅलेक्सी A51 च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या ओनची किंमत २५ हजार २५० रुपयांऐवजी २३ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता २५ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर दुसरीकडे सॅमसंग गॅलेक्सी A71 च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३१ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A71 चे वैशिष्ट्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी डिस्प्ले ओ दिला आहे. या फोनमध्ये अड्रीनो 618जीपीयू सोबत स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १२ मेगापिक्सलचा आणि दोन ५ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A51 ची वैशिष्ट्ये सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस Super AMOLED डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये Exynos 9611 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mahs48