मुंबई: जाणकारांकडून कौतुक झालेला आणि भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत निवड झालेल्या '' (२०१५) या चित्रपटाचा दिग्दर्शक , पुढे कोणता चित्रपट करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. चैतन्यच्या आणखी एका चित्रपटाची जगभरात दखल घेतली जात आहे. '' असं या मराठी चित्रपटाचं नाव असून, मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला.या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं, तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात भारतीय चित्रपटाची निवड झाली होती. जागतिक चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट दिग्दर्शकांनी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. अनेक जागतिक चित्रपट महोत्सवात मराठी कलाकार, तंत्रज्ञ यांचा गौरव झाला आहे. 'कोर्ट' या आपल्या पहिल्याच दिग्दर्शनातून जागतिक सिनेविश्वाला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या चैतन्यनं यावेळीही अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे. चैतन्यनं दिग्दर्शित केलेल्या 'द डिसायपल' हा चित्रपट ७७व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात दाखवण्यात आला. मराठी चित्रपटानं भारतीय सिनेविश्वात खोवलेला हा मानाचा तुरा असून, 'द डिसिपल' हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. याचं कथानक मुंबईत घडतं. या चित्रपटामध्ये भारतीय शास्त्रीय गायक आदित्य मोडकप्रमुख भूमिकेत असून, तबलावादक अनीश प्रधान यांची संगीत रचना सिनेमाला लाभली आहे. नरेन चंदावकर यांनी संगीत तयार करून ते प्री-मिक्स केलं आहे. हा क्षण माझ्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीकडून आपल्याला शास्त्रीय संगीताचं खूप मोलाचं देणं लाभलं आहे. हा चित्रपट एका शिष्याची अनोखी सांगीतिक गोष्ट सांगतो. माझा हा चित्रपट म्हणजे गेल्या चार वर्षांची मेहनत आहे. अतोनात प्रेम आणि कष्टानं आम्ही हा चित्रपट तयार केला असून, आता कुठे कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटत आहे. - चैतन्य ताम्हाणे, दिग्दर्शक
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZgDbxr