Full Width(True/False)

पहिल्या दिवशी उशिरा तर दुसऱ्या दिवशी वेळेच्याआधी का पोहोचली रिया?

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला एनसीबीने आज सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. आज दिवसभर रियाची अमली पदार्थांच्या वापराबद्दल प्रश्न विचारण्यात येणार आहेत. रियाला आज सकाळी १० वाजता कार्यालयात येण्यास सांगण्यात आलं होतं. पण आज ती लवकर घराबाहेर पडली आणि १० वाजण्याच्याआधीच तिने कार्यालय गाठलं. रिया वेळेआधीच एनसीबी कार्यालयात का पोहोचली? आज रियाचं एनसीबी कार्यालयात लवकर पोहोचण्याचं कारणदेखील फार महत्वाचं आहे. रविवारी एनसीबीने जेव्हा रियाला चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा ती दिड तास उशिरा गेली होती. यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी कमी वेळ मिळाला आणि रियाला आज पुन्हा चौकशीसाठी बोलवावं लागलं. रविवारी उशिरा गेल्यानंतर रियाने एनसीबी अधिकाऱ्यांना तक्रार करण्याची कोणतीही संधी न देण्याचं ठरवलं आणि आज ती कार्यालयात एक तास लवकर पोहोचली. रिया सकाळी ९ च्याही आधी एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. सध्या एनसीबी कार्यालयात रियाची चौकशी केली जात आहे. रियाची आजची उत्तरं तिला अटक होणार की नाही याचा निर्णय घेणारी असतील. रियासोबत शौविक, सॅम्युअल आणि दिपेश सावंत यांचीही एकमेकांसमोर बसवूनच उलटपक्षी चौकशी केली जाईल. रियाच्या उत्तरावर एनसीबी समाधानी नसल्यास किंवा रियानं खोटी विधानं दिल्यास तिला अटक होण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या चौकशीत रियाने अमली पदार्थांचं सेवन केल्याचं नाकारलं होतं. दिपेश सावंत समोरच केली जाईल रियाची चौकशी एनसीबी रिया चक्रवर्तीची आज दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दिपेशसमोर रियाची चौकशी केली जाईल. एनसीबीने आधीपासूनच दिपेश हा ड्रग सिंडिकेटचा भाग असल्याचा दावा केला आहे. तसेच त्याचे अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटी आणि ड्रग डीलरशी संबंध असल्याचंही समोर आलं आहे. झैद, शौविक आणि मिरांडाची वैद्यकीय चाचणी एनसीबीने सोमवारी झैद विलात्रा, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाची वैद्यकीय चाचणी केली. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांना पुन्हा एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. जोवर कोठडीत आहेत तोवर दर २४ तासांनी आरोपींची वैद्यकीय चाचणी केली जाईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jZQryF