मुंबई :आपले हट के फॅशनेबल कपडे आणि मादक अदांसाठी अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. आजवर अनेक चित्रपटांमध्ये तिनं जवळीक दाखवणारी दृश्यं बिनधास्त केली आहेत. मात्र, त्यामागचं कारण तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे. 'अशा दृश्यांना जर तुम्ही नकार दिला, तर तुम्हाला चित्रपटांमधून बाहेर काढलं जातं', असं समीरा म्हणते. 'चुंबन दृश्य करण्यास नकार दिल्यामुळे एकदा एका चित्रपटातून मला बाहेर काढण्यात आलं होतं', असा अनुभव समीरानं सांगितला आहे. एका मुलाखतीत तिनं आपल्या करिअरमधील हा अनुभव सांगितला. ती म्हणाली, की 'मी एका चित्रपटात काम करत होते. चित्रपटाचं शूटिंग पंचवीस टक्के पूर्ण झालं होतं. दरम्यान अचानक दिग्दर्शकानं मला एका किसिंग सीनविषयी सांगितलं. मूळ स्क्रिप्टमध्ये तो सीन नव्हता. परंतु अचानक निर्मात्यांच्या सांगण्यावरुन तो सीन वाढवण्यात आला होता. त्या चुंबन दृश्याचा पटकथेशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे मी थेट नकार दिला. त्यानंतर तो सीन करण्यासाठी विविध प्रकारे माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु, मी माझ्या निर्णयावर ठाम होते. अखेर निर्मात्यांनी मला चित्रपटातून बाहेर काढलं.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2F9BmM3