Full Width(True/False)

अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मुंबई: प्लॉटधारकांना खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या कोर्टानं हा आदेश दिला.यापूर्वी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. अंतिम निकाल देताना त्यांचा अर्ज कोर्टाने नामंजूर केला. मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि. या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील जमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभितेने यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता ही जमीन विक्री करून १४ जणांची ९६ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. याबाबत जयंत प्रभाकर बहिरट (वय ५७, रा. गांधीभवन जवळ, कोथरूड) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार जयंत रामभाऊ महाळगी, सुजाता जयंत महाळंगी (रा. गिरीवन डोंगरगाव, ता. मुळशी) आणि अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, 'गिरीवन प्रकल्प गेली तीस वर्षे व्यवस्थित चालू आहे. काही जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेतली असता त्यांना त्यांचा सातबारा उतारा आणि वहिवाट यात फरक आढळला आहे. जमिनीची मालकी व वहिवाट या दिवाणी स्वरूपाच्या विषयांमधील फरकांची विसंगती कशी दूर करता येईल याबाबत संबंधित जमीन मालकांच्या बरोबर बोलणी चालू आहे. कोणाचीही फसवणूक करण्याचा गिरीवनचा हेतू नाही,' अशी माहिती गिरीवन प्रोजेक्ट मॅनेजमेंटतर्फे देण्यात आली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jdEoxJ