मुंबई- '' या मालिकेच्या टीमला अजूनन एक धक्का बसला आहे. गुलफाम कलीची भूमिका साकारणार्या अभिनेत्री फाल्गुनी रजनीने शो सोडला आहे. फाल्गुनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नव्या मराठी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यावरूनच सीनेवर्तुळात मराठी मालिकेसाठी हिंदीचा नावाजलेला शो सोडल्याची चर्चा सुरू आहे. फाल्गुनीच्याआधी 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतून गोरी मेमची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शोचे दिवसही चांगले जात नाहीत. शोमध्ये अनिता भाभी अर्थात गोरी मेम सौम्या टंडनने काही दिवसांपूर्वी मालिकेला निरोप दिला होता. सध्या मालिकेचे निर्माते नवीन अभिनेत्रीच्या शोधात असतानाच दुसऱ्या अभिनेत्रीनेही आता मालिका सोडली आहे. 'टेली चक्कर'च्या वृत्तानुसार, 'भाभीजी घर पर हैं' गुलफाम कलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फाल्गुनी रजनीने शोला निरोप दिला आहे. रिपोर्टनुसार, 'भाभीजी...' मध्ये हप्पू सिंहसोबत फाल्गुनीचे बहुतेक सीन होते, पण 'हप्पू सिंह' वर एक वेगळा शो तयार करण्यात आल्यानंतर या मालिकेत फाल्गुनी कमी दिसू लागली. असं असलं तरी अजूनही फाल्गुनी किंवा निर्मात्यांकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. फाल्गुनीचा नवीन मराठी शो, शेअर केला प्रोमो दरम्यान, फाल्गुनी रजनीने एक नवीन मराठी शो साइन केला आहे. या मालिकेचा एक प्रोमो तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला. श्रीमंता घरची सून असं या नवीन मालिकेचं नाव आहे. यात ती पूर्णपणे वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mzndZv