Full Width(True/False)

कंगना राणावतची मराठी पत्रकाराला जेलमध्ये धाडण्याची धमकी

मुंबई: बॉलिवूड, मुंबई पोलिस आणि राज्य सरकारसोबत पंगा घेतल्यानंतर अभिनेत्री हिनं आता मीडियावर निशाणा साधलाय. ट्विट करत तिनं पत्रकाराला थेट तुरुंगात धाडण्याची धमकी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करायचं होतं, पण नाइलादास्तव शिवसेनेला मतदान करावं लागलं , असं कंगनानं म्हटलं होतं. पण एका वृत्त वाहिनीचे पत्रकार यांनी तिच्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं केलेला दावा कसा चुकीचा आहे दाखवून दिलं होतं. सुतार यांच्या ट्विट नंतर कंगनानं त्यांना ट्विटरवर धमकी देत आणि कायदेशीर नोटीस पाठवेन, असं म्हटलं होतं. कंगनाचा खोटे पणा उघड? कंगना सध्या मुंबईतील खार परिसरात राहत असून वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघात तिनं मतदान केलं होतं. कंगनानं दावा केलाय, की तिनं नाइलादास्तव शिवसेनेच्या उमेदवराला मतदान केलं होतं. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार उभे होते, तर लोकसभेला भाजपच्याच पुनम महाजन उभ्या होत्या. तर २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सेनेची युती होती. परंतु भाजपच्या पुनम महाजनचं उभ्या होत्या. असं सांगत कमलेश सुतार यांनी कंगनाचा शिवसेनाला मतदान केल्याचा दावा खोडून काढला. दरम्यानं, कमलेश सुतार यांना धमकी दिल्याचे आणि कायदेशीर नोटीस पाठवण्याचे ट्विट कंगनाने डिलीट केले असले तरी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि मंत्रालय विघिमंडळ वार्ताहर संघ यांच्याकडून कंगनाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mtBoPP