तेलगू टीव्ही अभिनेत्री हिने मंगळवारी (८ सप्टेंबर) रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. मनसु ममता या टीव्ही शोने श्रावणीला ओळख मिळवून दिली. गेल्या आठ वर्षांपासून श्रावणी टीव्ही मालिकांमध्ये एक अभिनेत्री म्हणून काम करत होती. तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका वठवली होती. ताज्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री हैदराबादच्या मधुनगर येथील राहत्या घरी बाथरूमच्या सेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया इस्पितळात नेण्यात आला. श्रावणीच्या घरच्यांनी देवराज रेड्डी नावाच्या व्यक्तीविरोधात एप्सर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस तिच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या भावाने पोलिसांना सांगितलं की, श्रावणी टीक-टॉकच्या माध्यमातून काकीनाडाच्या गोलापारोलू येथील देवराज रेड्डीला भेटली होती. यानंतर ते दोघं मित्र झाले. सुरुवातीला तो चांगला होता. पण नंतर त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. या सगळ्या परिस्थितीला कंटाळून श्रावणीने मध्यरात्री बाथरूममध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35ibY1e