Full Width(True/False)

ज्यूस पितानाच आला ब्रेन स्ट्रोक, सुरेखा सीखरी यांची तब्येत नाजूक

मुंबई- '', 'परदेश में है मेरा दिल', 'एक था राजा एक थी राणी' यांसारख्या टीव्ही मालिकां व्यतिरिक्त अनेक सिनेमांत काम केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची तब्येत नाजूक आहे. त्यांना मंगळवारी (८ सप्टेंबर) झाल्यामुळे अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि तातडीने त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं मुंबईच्या यारी रोड येथील राहत्या घरी अचानक त्यांची प्रकृती खालावली. नंतर त्यांना जवळच्या क्रिती केअर इस्पितळात दाखल करण्यात आलं. आता त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या आणि इतर तपासणी केली जात आहे. २०११८ मध्येही आला होता ब्रेन स्ट्रोक, डावी बाजू आहे पॅरालाइज्ड नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नर्स म्हणाली की, सकाळी साधारणपणे ११ वाजता त्या घरी ज्यूस पीत होत्या. तेव्हा अचानक त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. यापूर्वीही त्यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये ब्रेन स्ट्रोक झाला होता, ज्यामुळे त्यांना नंतर अर्धांगवायूचा झटकाही आला होती. त्यांची डावी बाजू पॅरालाइज्ड झाली होती. चित्रीकरणादरम्यान त्या पडल्या होत्या. मात्र नंतर त्या हळूहळू बऱ्या झाल्या. त्याच्यासोबत काळजी घेण्यासाठी घरी एक नर्सही होती. ज्यूस पिताना आला ब्रेन स्ट्रोक, उपचारांसाठी मागितली आर्थिक मदत परिचारिकाने सांगितलं की, सकाळी ११ च्या सुमारास त्या घरी ज्यूस घेत होत्या तेव्हा अचानक त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. सुरेखा यांची परिचारिका त्यांना घेऊन क्रिती केअर इस्पितळात पोहोतली. इथे त्यांच्यावर आता तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. इतर इस्पितळांमध्ये जास्त पैसे आकारले जात आहेत आणि त्यांच्याकडे आता इतकेही पैसे नाहीयेत की त्यांच्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात. म्हणून परिचारिकेने सुरेखा यांना क्रिती केअर इस्पितळात दाखल केलं. आता सुरेखा यांच्यावतीने त्यांच्या परिचारिकेने आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hjJ9UI