मुंबई: बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि भाऊ यांच्यानंतर आता तिच्या आई- वडिलांचीही चौकशी केली जात आहे. सीबीआयसोबतच नारकोटिक्स ब्युरोही या प्रकरणात ड्रग अँगलनं चौकशी करत आहे. सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स या तिघांच्या चौकशीत नवीन गोष्टी समोर येत आहेत. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, रियाचा भाऊ शौविक याचं ड्रग डिलरसोबतचं थेट कनेक्शन उघड झालं आहे. शौविक आणि ड्रग डिलर यांचं चॅट देखील समोर आलं आहे. रियानं सुशांतला ड्रग्सचे ओव्हर डोस दिल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला आहे. याचाच तपास करण्यासाठी नारकोटिक्स ब्युरोनं अनेकांची चौकशी केली आहे. याप्रकरणात एका ड्रग डिलरला अटक केलं असून त्यानं शौविक सोबत थेट संपर्कात असल्याचं कबूल केलं आहे. वाचा: शौविक आणि ड्रग डिलर यांच्या व्हायरल झालेल्या चॅटमध्ये रियाच्या वडिलांचा देखील उल्लेख आहे. रियाचे वडिल हे देखील ड्रग घेत होते का? असा सवाल उपस्थित होत आहे. किंवा या एक कोडवर्ड देखील असू शकतो. व्हायरल चॅटमध्ये शौविक डिलरकडे ड्रगची मागणी करत आहे. वाचा: शौविक: भावा कुठं आहे? ड्रग डिलर: घरीच आहे. शौविक: बूम (मारूआना ) पाहिजे भावा,बाबांना हवं आहे.त्यांचा माल संपल्याचं त्यांना समजलंच नाही. ड्रग डिलर: माझ्याकडंचाही माल संपलाय, उद्या देतो. शौविक आणि ड्रग डिलर यांच्यात झालेलं हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चक्रवर्ती कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत प्रकरणात अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणीत चार मोठी नावं गुंतलेली आहेत. यात मुंबईतील दोन नेते, एक टीव्ही अभिनेता आणि एक सिनेनिर्माता यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना या प्रकरणाचा तपास करत आहे. रिया चक्रवर्तीने याआधी तिने कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं म्हटलं. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की सुशांतला गांजा ओढायची सवय होती. या व्यतिरिक्त रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, 'रियानं कधीही अमली पदार्थ घेतले नाही. तसेच रिया यासंबंधीची चाचणी करायलाही तयार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gSbssQ