Full Width(True/False)

बालसुब्रमण्यम यांचा व्हिडिओ व्हायरल; सांगितली होती करोनाची लक्षणं

मुंबई: सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव भरून निघणं अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. बालसुब्रमण्यम यांना ५ ऑगस्टला करोनाचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना तातडीनं चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. त्यांनी करोनावर मात देखील केली होती. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावत गेली आणि त्यांचं निधन झालं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बालसुब्रमण्यम यांनी फेसबुक लाइव्हद्वारे चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली होती. अनेक जण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सतत फोन करत होते त्यामुळं व्हिडिओद्वारे त्यांनी काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं होतं. काय म्हणाले होते बालसुब्रमण्यम? व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते की, 'गेल्या दोन- तीन दिवसांपासून माझी प्रकृती थोडी बिघडल्यासारखी वाटत होती. छातीत दुखणं आणि सर्दी होता. तसंच ताप येत- जात होता. याशिवाय कोणताही त्रास नव्हता. पण मला या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं म्हणून मी करोनाची टेस्ट केली. यानंतर डॉक्टरांनी मला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्यांनी मला औषधं दिली आणि सांगितलं की मी घरीच राहू शकतो. त्यांनी १५ दिवसांसाठी सेल्फ क्वारन्टीन होण्यास सांगितलं होतं. पण कुटुंबातील इतर सदस्यांचं आयुष्य मी धोक्यात घालू शकत नाही. याचमुळे मी रुग्णालयात येण्याचा निर्णय घेतला. इथं माझी चांगली काळजी घेतली जात आहे.' पाहा व्हिडिओ:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34ejdp1