Full Width(True/False)

पेडलरचा श्रद्धा- साराबद्दलचा खुलासा, कारमध्येच द्यायचा ड्रग्ज

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत बॉलिवूडमधील स्टार सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. ही सर्व नावं व्हॉट्सअ‍ॅप चॅट, रिया चक्रवर्तीचा जबाब आणि या प्रकरणात पकडल्या ड्रग्ज पेडलर्सच्या जबाबातून समोर आली आहेत. दरम्यान, ड्रग्ज पेडलर करमजितने अभिनेत्री आणि सारा अली खानविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, करमजीतने एनसीबीकडे मान्य केलं की, त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि यांना कार आणि कुरिअरद्वारे ड्रग्जचा पुरवठा केला आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करमजीतने असा दावा केला आहे की, श्रद्धाच्या नावावर त्याने चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज पुरवले आहेत. चारहीवेळा त्याने ड्रग्जची पाकिटं त्याने गाडीत दिली आहेत. करमजितने असंही म्हटलं की कारमधे दिलेली ड्रग्जची पाकिटं श्रद्धा स्वत: साठी घ्यायची की दुसऱ्यांना देण्यासाठी हे त्याला माहीत नाही. शनिवारी एनसीबी श्रद्धा कपूरचीही चौकशी करणार आहे. एनसीबीने बुधवारी तिच्या घरी समन्स पाठवला आहे. त्याचवेळी, पेडलर करमजितने अभिनेत्री सारा अली खानलाही ड्रग्ज पुरवल्याचं मान्य केलं आहे. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातमीनुसार करमजितने असंही सांगितलं की त्याने सारा अली खानला दोनदा ड्रग्ज पुरवले आहेत. कुरिअरच्या माध्यमातून त्याने अभिनेत्रीला ड्रग्ज दिले होते. एनसीबीने सारा अली खानलाही करमजितच्या जबाबाची उलट तपासणी करण्यासाठी समन्स बजावला आहे. ती आई आणि भावासोबत गोव्यात होती. समन्स मिळताच ती गोव्याहून मुंबईला परतली. दरम्यान, गुरुवारी रात्री दीपिका पादुकोणही गोव्याहून मुंबईला पोहोचली. तिच्यासोबत तिचा नवरा रणवीर सिंगही होता. असं म्हटलं जात होतं की, रणवीरने चौकशी दरम्यान दीपिकासोबत त्याला बसण्याची एनसीबीला विनंती केली आहे. दीपिकाला एन्झायटीचा त्रास आहे. त्यामुळे अचानक घाबरून तिची तब्येत बिघडते. याचमुळे त्याला दीपिकासोबत रहायचे आहे. यासोबतच चौकशी दरम्यान कोणालाही उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत नाही हा नियम रणवीरला माहीत असूनही त्याने एनसीबीकडे विनंती केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/342Glq8