Full Width(True/False)

'माल' घेतला नाही तर १२ वकिलांची टीम कशाला; अभिनेत्रीचा दीपिकावर निशाणा

मुंबई : अभिनेता प्रकरणात अमली पदार्थांसंबंधी अभिनेत्री हिची चौकशी करण्यात येत आहे. एनसीबीच्या गेस्ट होऊसमध्ये दीपिकाची चौकशी सुरू असून तिनं एनसीबीला दिलेल्या उत्तरांनी एनसीबीचे अधिकारी समाधानी नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुळं दीपिकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. असं असलं तरी दीपिकाचे चाहते तिच्यासोबत असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे . हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतोय. परंतु बॉलिवूडधील अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिनं दीपिकावर निशाणा साधला आहे. ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. त्याचं दीपिका सारख्या अभिनेत्रीचं नाव यात आल्यानं अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे दाबे दणाणले आहे. यावरून शर्लिन चोप्रा हिनं दीपिकावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधलाय. तिनं एक ट्विट केलं असून 'जर ड्रग्ज घेतले नाहीत तर मग १२ वकिलांच्या टीमची काय गरज आहे', असं शर्लिन हिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमली पदार्थांसंबंधी एनसीबीनं समन्स बजावल्यानंतर दीपिकानं १२ वकिलांची टीम तयार केली आहे. दीपिकाला या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कायदा सल्लागार आणि वकिल अशी १२ जणांची टीम कामाला लागल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे शर्लिनंचं: जर तू 'माल' ( ड्रग्ज)चं सेवनं केलं नाहीस, तर १२ वकिलांचा सल्ला घेण्याची गरज का पडली? खरं बोलणाऱ्या व्यक्तीला पॅनिक किंवा ऐंग्जाइटी अॅटॅक्स येत नाहीत', असं शर्लिननं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S1spr6