Full Width(True/False)

सॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती

नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या तीन स्मार्टफोनच्या , , आणि Galaxy M01 किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केली आहे. याआधी कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए ७१ पासून गॅलेक्सी ए५१ आणि गॅलेक्सी ए२१एस सह ६ फोन्सच्या किंमतीत कपात केली होती. कंपनीने एम सीरीजच्या किंमतीत कपात केली आहे. वाचाः नवीन किंमती ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम ३१ एस च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. यानंतर स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत १९ हजार ४९९ रुपये, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ४९९ रुपये झाली आहे. याप्रमाणे गॅलेक्सी एम ११ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५०० रुपये कमी झाली आहे. आता या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ हजाराने कमी होऊन ११ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ४०० रुपयांच्या कपातीनंतर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः सॅमसंग Galaxy M31s चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. यात ८ जीबीपर्यंत रॅम, १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. तसेच Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा प्लस + 12 MP + 5 MP + 5 MP कॅमेरा दिला आहे. ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः सॅमसंग Galaxy M11 चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा HD+ LCD इनफिनिटी-O डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम आणइ ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी 13 MP + 5 MP + 2 MP रियर कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः सॅमसंग Galaxy M01 चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ५.७१ इंचाचा एचडी प्लस इनिफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 4,000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/367TTU7