मुंबई : सोनू सूदनं वेगवेगळ्या स्तरांववर सुरू केलेल्या मदतकार्याचं खूप कौतुक होत आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत तो काही ना काही माध्यमातून तो, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतोय. लवकरच तो राजकारणात उतरणार, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. परंतु, खुद्द सोनूनंच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबाबत सोनू म्हणाला की, 'मला गेल्या दहा वर्षांपासून एका राजकीय पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. बरेच लोक म्हणाले, की मी एक चांगला नेता होऊ शकतो. परंतु सध्या मी एक अभिनेता आहे. त्यात अद्याप बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. मी कधीही राजकारणामध्ये प्रवेश करू शकतो, परंतु मी दोन दगडांवर पाय ठेवणारा नाही.' तसंच तो पुढे म्हणाला, 'एकदा मी राजकारणात उतरलो तर मी माझं शंभर टक्के लक्ष तिकडेच देईन. मी आश्वासन देतो, की माझ्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही. मी सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेन. मी वेळ देईन. पण आत्ता यासाठी मी तयार नाही. कोणत्याही पक्षाला विचारून किंवा सल्ला घेऊन मी लोकांना मदत केलेली नाही. हे सर्व मी माझ्या इच्छेनुसार केलं. मला आठवतं जेव्हा श्रमिक लोक जेव्हा लाखोंच्या संख्येनं पायी आपल्या गावी, घरी जायला निघाले होते तेव्हा मी पाहिलं. ते पाहून मला खूप वाईट वाटलं. त्यावेळी आम्ही रोज काही हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZcZEvk