मुंबई :'' या मालिकेच्या सेटवर काही जण आढळले होते. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री यांचंही करोनामुळे निधन झालं. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री या आशालता यांच्यासोबत होत्या. त्यामुळे अलका कुबल यांनाही करोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पण खुद्द अलका यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. कुबल यांनी त्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, 'आई माझी काळूबाई' मालिकेच्या सेटवरील सर्व जण आता ठीक आहेत, फिट आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, ज्या मला आईसमान होत्या, त्यांचं निधन झालं. आम्ही सगळ्यांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. साताऱ्याला प्रतिभा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. चार दिवस मी त्यांच्यासोबत होते. म्हणून अशाही अफवा पसरल्या होत्या की मलाही करोनाची लागण झाली. मला तर किती जणांनी सोशल मीडियावर श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की, रसिकप्रेक्षकहो तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत. मी ठीक आहे आणि आमचं युनिट पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झालंय. सर्वांची करोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तुमचा पाठिंबा असाच राहू द्या'. त्यानंतर सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mUylA9