Full Width(True/False)

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन १० सप्टेंबरला येतोय, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंग गेल्या काही दिवसांपासून भारतात आपल्या गॅलेक्सी एम५१ स्मार्टफोनची माहिती शेयर करीत आहे. आता कंपनीने नवीन गॅलेक्सी फोन भारतात लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. सोमवारी ला जर्मनीत लाँच केले होते. सॅमसंगच्या या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 7000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः अॅमेझॉन इंडियावर चे टीझर पेज अपडेट करण्यात आले आहे. या नुसार, नवीन हँडसेट १० सप्टेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. हा फोन दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये याला लाँच करण्यात येणार आहे. ज्यांना फोन खरेदी करायचा आहे त्यांनी notify me बटनावर क्लिक करून गॅलेक्सी एम५१ संबंधित अपडेट मिळवू शकता. फोनची वैशिष्ट्ये आधीच समोर आली आहेत. जर्मनीत गॅलेक्सी एम५१ ची किंमत ३६० यूरो म्हणजेच जवळपास ३१ हजार ४०० रुपये आहे. या फोनला दोन रंगात म्हणजेच ब्लॅक आणि व्हाइट रंगात आणले आहे. या स्मार्टफोनला भारतात २५ हजार ते ३० हजार रुपयांदरम्यान लाँच केले जावू शकते. वाचाः वाचाः फोनची खास वैशिष्ट्ये गॅलेक्सी एम५१ मध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. याच्या नावाची माहिती अद्याप उघड झालेली नाही. परंतु, फोनमध्ये क्वॉलकॉम प्रोसेसर असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा फोन ६ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 7000mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात ४जी एलटीई सपोर्ट, ड्यूल सिम सपोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि सॅमसंग नॉक्स यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32HQ7NS