नवी दिल्लीः दिग्गज टेलिकॉम कंपनी वोडाफोन - आयडियाने दोन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. छोट्या वैधतेसोबत कमी किंमतीचे आहेत. कंपनीने १०९ रुपये आणि १६९ रुपयांचे दोन प्लान आणले असून याची वैधता २० दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना डेटा आणि कॉलिंग सोबत अन्य सुविधा मिळते. वाचाः वाचाः वोडाफोनचा १०९ रुपयांचा प्लान कंपनीने १०९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात एकूण १ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळते. तसेच वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानची वैधता २० दिवसांची आहे. हे काही सर्कलमध्ये मिळणाऱ्या ९९ रुपयांच्या प्लानचे अपग्रेड आहे. ज्यात दोन दिवसांची वैधता मिळते. ९९ रुपयांच्या प्लानमध्ये १८ दिवसांची वैधता होती. वाचाः वाचाः वोडाफोनचा १६९ रुपयांचा प्लान हा प्लान जवळपास १०९ रुपयांसारखा आहे. परंतु, यात डेटा आणि एसएमएस जास्त दिले आहे. यात युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग जास्त मिळते. ग्राहकांना रोज १ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस मिळते. तसेच वोडाफोन प्ले आणि झी ५ च्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानची वैधता २० दिवसांची आहे. वाचाः वाचाः या युजर्संना मिळणार फायदा सध्या या प्लान्सची एक्सक्लूसिवली दिल्लीच्या युजर्संसाठी आहे. तसेच कंपनीने ४६ रुपयांच्या प्लान व्हाऊचरला दिल्ली सर्कलमध्ये सुरू केले आहे. आधी हे व्हाऊचर केवळ केरळ सर्कलमध्ये होते. नवीन प्लान्सला कंपनीने वेबसाईटवर अपडेट केले आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QMvudK