Full Width(True/False)

शाओमीच्या या फोनची जगभरात धूम, २.५ कोटींहून जास्त विक्री

नवी दिल्लीः ने आपला प्रसिद्ध सीरीजची २५ मिलियन म्हणजेच २.५ कोटींहून जास्त फोनची विक्री केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, रेडमी ८ सीरीजला हा आकडा गाठण्यासाठी १२ महिन्यांचा वेळ लागला. या सीरीज अंतर्गत कंपनी Redmi 8, Redmi 8A, आणि Redmi 8A Dual स्मार्टफोन लाँत केले आहेत. रेडमीच्या या तिन्ही बजेट स्मार्टफोनला जगभरात पसंत केले जात आहे. यानंतर कंपनीने २.५ कोटी रेडमी मोबाइल फोन शिप करण्यात यश मिळवले आहे. वाचाः वाचाः रेडमी ८ए ड्यूलची भारतात किंमत या बजेट फोनची २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. तर ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. Redmi 8A Dual मध्ये टियरड्रॉप नॉच सोबत ६.२२ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720 x 1520 पिक्सल आणि ऑस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. फोनची स्क्रीनला गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये १८ वॉट ची फास्ट चार्जिंगसोबत 5,000 mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः रेडमी ८ बजेट फोनमध्ये जबरदस्त फीचर्स Redmi 8 स्मार्टफोन MIUI 10 सोबत अँड्रॉयड 10 चालतो. फोनमध्ये MIUI 11 सोबत अँड्रॉयड १० अपडेट मिळणे सुरू झाले आहे. फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर दिला आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत येतो. बजेट फोन बनवणारी कंपनी म्हणून शाओमीकडे पाहिले जाते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32IBNEO