मुंबई: गोऱ्या रंगाला हे शोभून दिसते, ते शोभून दिसते, असे म्हणताना आपण सावळ्या रंगावर अन्याय करतो आहोत, याचा पत्ताही नसतो. हीच मानसिकता जेव्हा समूहाद्वारे व्यक्त केली जाते, तेव्हा त्यातून रंगविद्वेष निर्माण होतो. आपण सारे रंगभेदाला कळत नकळत सहजपणे खतपाणी घालत असतो. बॉलिवूडमध्येही हा रंगभेद अनेक कलाकारांनी अनुभवला आहे. अनेकदा ते व्यक्तही झाले आहेत. परंतु बॉलिवूडचा किंग याच्या लेकीला देखील वर्णभेदाचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत शाहरुख ची मुलगी हिनं तिला सावळ्या रंगावरून हिणवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सुहाना सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटोही शेअर करते. पण तिच्या या फोटोंवर वर्णभेदी प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. याच ट्रोलर्संची सुहानानं तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून शाळा घेतली आहे. सुहानानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले आहेत. काय म्हटलंय सुहानानं तिच्या पोस्टमध्ये? सध्या खूप काही गोष्टी घडत आहेत. त्यामुळं या महत्त्वाच्या विषयावरही बोलायलाच हवं. काही तरी करायला हवं. हा काही माझ्या एकटीचा विषय किंवा मुद्दा नाही. प्रत्येक तरुण-तरुणीविषयी आहे, जे सावळ्या रंगामुळं न्यूनगंड बाळगतायत, त्या सर्वांसाठी हा विषय महत्वाचा आहे. मी १२ वर्षाची असल्यापासून मला माझ्या सावळ्या रंगावरून हिणवलं जात. अनेक प्रौढ लोकांनीही माझ्या दिसवण्यावरून माझी मस्करी केलीए. जर तुमची उंची ५.७ इंच नसेल, तुमचा वर्ण गोरा नसेल, तर तुम्ही सुंदर नाही, असं आपल्याकडं सर्रास म्हटलं जातं. हे फारच दुर्दैवी आहे. आपण सर्वच भारतीय आहोत. त्यामुळं आपोआपच आपला रंग असा गव्हाळ आहे. देशात अनके वर्णाची माणसं आहेत. तुम्ही कितीही यापासून पळण्याचा प्रयत्न केलात तरी, तुम्ही या सर्वापासून दूर जाऊ शकत नाही. त्यामुळं रंगावरून सुंदरचेती व्याख्या करणं बंद करायला हवं, असं सुहानानं म्हटलं आहे. तसंच माझी उंची ५.३ इंच आहे. मी गव्हाळ रंगाची आहे. मी फार खूष आहे. तुम्हीही असायला हवं',असंही सुहाना म्हणतेय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2G3v7tL