मुंबई टाइम्स टीम अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. मात्र हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. या फोटोमुळे तिला काही जणांनी ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला. पण, आशानं देखील ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेत, आपल्या अनोख्या शैलीत त्यांना कडक इशारा दिला. 'तुमच्यावर तक्रार दाखल करेन', असा सज्जड दम तिनं दिला आहे. सोशल मीडियावर कलाकारांना होणारं ट्रोलिंग सध्या खूप चर्चेत आहे. काही कलाकार ट्रोलिंगला कंटाळून सोशल मीडियाला रामराम ठोकत आहेत. काही कलाकार मात्र ट्रोलर्सना सज्जड दम देऊ लागले आहेत. आशानं एका जुन्या घरासमोर उभं राहून एक फोटो काढला होता. तिचा हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. 'आता तू म्हातारी झाली आहेस, लवकर लग्न कर, तुझ्यापेक्षा ती मागची भिंत अधिक तरुण दिसतेय.' अशा आशयाची पोस्ट लिहित तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रोलर्सच्या या टीकेवर आशानंदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. ट्रोलर्सना इशारा देताना ती म्हणाली, की 'मित्रांनो, तुमच्या विनोदाला मी १०० गुण देते. पण तुमच्या विचारांचं काय करायचं? या प्रकरणी सायबर बुलिंगची तक्रार देखील होऊ शकते.' आशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Gh115D