मुंबई- जसजसं बॉलिवूडमधे पसरलेलं ड्रग्ज रॅकेटच्या जवळ एनसीबीची चौकशी जात आहे, तसतसं अनेक धक्कादाय खुलासे समोर येत आहेत. एकीकडे रकुलप्रीत सिंगने ड्रग्ज चॅट केल्याचं मान्य केल्यानंतर आता दीपिका पादुकोणबद्दलही आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्या ग्रुपमध्ये ड्रग्जच्या सर्वाधिक चर्चा व्हायच्या त्या व्हॉच्सअप ग्रुपची दीपिकाच अॅडमिन होती. दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये याच ग्रुपमधून ड्रग्जची मागणी केली होती. जया शाह आणि करिश्मादेखील या ग्रुपमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. एनसीबीला मिळालेली ही माहिती दीपिकाच्या अडचणीत वाढ करू शकते. दीपिकाच्या अडचणीत वाढ शनिवारी एनसीबीने दीपिका पादुकोणला ड्रग्ज चॅट आणि त्यासंबंधीच्या चौकशीसाठी बोलावले आहे. शुक्रवारी फक्त रकुलप्रीत आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीच चौकशी होईल. रकुलची चौकशी पूर्ण झाली असून ती घरी जाण्यासाठी निघाली. तर आका करिश्माची चौकशी सुरू होणार आहे. दरम्यान, ज्या व्हॉ्ट्सअप ग्रुपवर ड्रग्जची चर्चा व्हायची त्याची अॅडमिन दीपिका असल्याचं समोर आल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री या वादात अडकतानाच दिसत नाहीये तर त्यांचा सक्रीय सहभागही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता एनसीबी काय निर्णय घेतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. एनसीबीने सुरू केली चौकशी शुक्रवारी दीपिका पादुकोणची चौकशी होणार होती. पण नंतर तिला शनिवारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी फक्त रकुलप्रीत सिंग आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचीच चौकशी केली जाणार. रकुलची सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. आता करिश्माची चौकशी सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत ही स्थिती पाहता हे प्रकरण लवकर संपेल असं वाटत नाही. त्यामुळे बॉलिवूड स्टार्सवर असलेली टांगती तलवारही कायम लटकत राहणार आहे. दरम्यान, एनसीबी दीपिकाला अनेक प्रकारे प्रश्न विचारणार असल्याचंही सांगितलं जात आहे. यासाठी प्रश्नांची लांबलचक यादी तयार करण्यात आली आहे. दीपिकाशिवाय एनसीबी सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी करणार आहे. त्यांनाही उद्या २६ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2G2h5Z4