मुंबई- ड्रग्ज चॅटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव समोर आल्यानंतर नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) तिला समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं. सुरुवातीला दीपिकाची चौकशी आज शुक्रवारी २५ सप्टेंबरला होणार होती. मात्र काही कारणांमुळे शनिवारी तिची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, आज दीपिकाशी निगडीत एक मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीचा परिणाम उद्या होणाऱ्या चौकशीवरही पडू शकतो. ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सेलिब्रिटी ड्रग्ज संदर्भात बोलायचे त्या व्हॉट्सअॅप ग्रुपची दीपिका अॅडमिन होती. २०१७ मध्ये याच ग्रुपमधून तिने ड्रग्जची मागणीही केली होती. दीपिका पादुकोणला विचारले जाऊ शकतात हे प्रश्न टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, एनसीबीची टीम दीपिका पादुकोणला ड्रग्जशी निगडीत प्रश्न विचारू शकते, २०१७ मध्ये हॅश- विडसाठी तू विचारलं होतं का ?, चॅटमध्ये 'माल' म्हणजे नक्की काय? तू करिश्मा प्रकाशकडून हॅश विकत घेतलं होतं का? या प्रश्नांची उत्तरं दीपिका काय देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जया साहाच्या चौकशीत समोर आलं दीपिका पादुकोणचं नाव दरम्यान, सुशांतसिंह राजपूतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत एनसीबीच्या हाती काही ड्रग चॅट लागले. यात दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि दीपिकामधले काही ड्रग्ज चॅट सापडले. यात दीपिका करिश्माला माल आहे का विचारते. याचं करिश्माने होकारार्थी उत्तर दिलं होतं. दीपिकासह अन्य ५ लोकांनाही एनसीबबीचा समन्स एनसीबीने बुधवारी दीपिका पादुकोणसह अन्य सेलिब्रिटींनाही बोलावलं आहे. आज शुक्रवारी रतुलप्रीत सिंग आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची चौकशी झाली. तर उद्या २६ सप्टेंबरला दीपिकासह सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचीही चौकशी होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FYGSBA