Full Width(True/False)

दीपिकासोबत गोव्यात आहे करिश्मा? दिलं होतं आजारी असल्याचं कारण

मुंबई- नुकतीच आणि तिची मॅनेजर यांचं नाव ड्रग्ज चॅट प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलं. यानंतर एनसीबीने करिश्मा प्रकाशला चौकशीसाठीचा समन्स बजावला. या समन्सवर करिश्माने ती आजारा असल्याचं कारण सांगून सूट मिळवली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा दीपिकासोबत सध्या गोव्यात आहे. रिपोर्टनुसार करिश्मा सध्या दीपिकासोबत गोव्यात असून तिथे दीपिकाच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरम सुरू आहे. शकून बत्रा दिग्दर्शित या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालेलं नाही. या सिनेमात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची संपूर्ण टीम गेल्याच आठवड्यात गोव्याला रवाना झाली होती. जया साहा या सेलिब्रिटी मॅनेजरचीही सध्या एनसीबीकडून चौकशी होत आहे. जया आणि रियाचे ड्रग्ज संबंधीचे अनेक चॅट याआधीच समोर आले आहेत. या चॅटच्याआधारे एनसीबीने मंगळवारी करिश्मा प्रकाशला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. या व्यतिरिक्त क्वान टॅलेन्ट मॅनेजमेन्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रूव चितगोपेकर यालाही समन्स पाठवला आहे. करिश्मा ही क्वानची कर्मचारी आहे. जया साहाने दिलेल्या माहितीनुसार ती D आणि K नावाच्या व्यक्तींशी बोलली होती. चॅटमध्ये ती N,J,S,D आणि K यांच्यात ड्रग्ज संदर्भात बोलताना दिसत आहे.यात डी म्हणजे दीपिका पादुकोण असल्याचं म्हटलं जात आहे. ड्रग्ज चॅटमध्ये D अर्थात दीपिका पादुकोण ज्या K कडे 'माल' म्हणजे ड्रग्ज मागत आहे. ती K करिश्मा आहे. जी क्वॉन टॅलेन्ट मॅनेजमेन्ट एजन्सीची एक कर्मचारी आहे. दीपिकाच्या प्रश्नावर करिश्मा उत्तर देते की, 'माझ्याकडे आहे पण घरी आहे.' मी आता वांद्र्यात आहे. करिश्मा पुढे म्हणते की, 'जर सांगाल तर मी अमितला विचारते.' यावर दीपिका त्याला 'हो, प्लीज.' असं उत्तर देते. यानंतर करिश्मा म्हणते की, 'अमितकडे आहे, तो ते घेऊन जात आहेत.' यावर दीपिका म्हणाली, 'हॅश आहे ना.. वीड नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HgnK27