Full Width(True/False)

एअरपोर्टवर कंगनासाठी एकमेकांना भिडले समर्थक- विरोधक

मुंबई- तिच्या व्हाय-प्लस सुरक्षेसह मुंबईत पोहोचली. अगदी थोड्या वेळात ती आपलं घर गाठेल. मात्र त्याआधी विमानतळावर तिच्या सुरक्षेसाठी मोठी फौज सज्ज करण्यात आली आहे. आतापर्यंत शेकडोवेळा कंगना मुंबई विमानतळावर उतरली असेल. पण आजच्या तिच्या मुंबईत येण्यात आणि आधीच्या प्रवासात खूप अंतर आहे. विमानतळावर कंगनाचे समर्थक मोठ्या प्रमाणात गोळा झाले आहेत. तर कट्टर शिवसैनिकही तिथे कंगनाच्या विरोधात उभे आहेत. एकीकडे करणी सेनेचे लोक कंगनाचं समर्थन करत आहेत तर जवळपास १०० हून अधिक विमानतळावर तिच्या विरोधासाठी उभे राहिले आहेत. 'निघून जा.. निघून जा.. कंगना रणौत निघून जा..' असे नारेही शिवसैनिक देत आहेत. यांच्या पक्षातील काही लोकांनी सांगितलं की ते कंगनाला सुरक्षा देण्यासाठी आले आहेत. यासोबतच पक्षाच्या नेत्यांनी असाही दावा केला की कंगनाने स्वतः रामदास आठवले यांना फोन करून सुरक्षेसाठीची आपली बाजू मांडली होती. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. यानंतरच मोठा गदारोळ माजला होता. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?' या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद देण्यात आली होती. यावर कंगनानं 'महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा', असं म्हटलं होतं. त्यामुळं शिवसेनेतच्या कार्यकर्त्यांकडून सध्या मुंबई विमानताळवर आंदोलन करत आंदोलन सुरू केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ijMtk0