मुंबई- सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती अनेकदा आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने वडिलांचा इस्पितळातला एक फोटो शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिताचे वडील इस्पितळात भरती आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना नक्की कोणता त्रास होतोय हे कळू शकलेलं नाही. मात्र तातडीच्या उपचारांसाठी त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. या फोटोत अंकितासोबत तिचे आई आणि वडील दिसत आहेत. तिघेही कॅमेऱ्याकडे पाहून स्मीतहास्य करत आहेत. हा फोटो शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आई आणि बाबा तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे मी शब्दात कसं व्यक्त करू हेच मला कळत नाहीए.' अंकिता लोखंडेने पुढे लिहिले की, 'आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. सगळ्यासाठी धन्यवाद मला तुमची मुलगी असल्याचा अभिमान आहे. बाबा लवकर ठीक व्हा आणि लवकर घरी या. मी तुला खूप प्रेम करतो.' या पोस्टसह अंकितानेही स्वतःला आणि जगातील सर्व मुलींना हॅपी डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असल्यामुळे तिचं अनेकदा कौतुक आणि ट्रोलही केलं जातं. अंकिताला तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळं ट्रोल करण्यात येत आहे. अंकिताला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचं कारण म्हणजे तिनं या फोटोंमध्ये परिधान केलेले कपडे. खरं तर अंकितानं हे फोटो तिची हेअरस्टाईल दाखवण्यासाठी केले होते.अंकिताच्या आईनं लहान लहान वेण्या घालून तिची हेअरस्टाईल केली आहे. पण या फोटोंमध्ये तिनं 'ओम' प्रिंट असलेला पायजमा घातलाय. पायजम्यावर हिंदू धर्मातील शुभ आणि देवाचं प्रतिक असलेलं ओम चिन्ह आहेच, त्याचसोबत काही मंत्र लिहिलेले आहेत.त्यामुळं असे कपडे घातल्यानं हिंदू देवतांचा अपमान झाल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cCNSjw