दावा फेसबुक युजर Dinesh Singh ने एक फोटो कोलाजइस या दाव्याने शेयर केला आहे की, आसाममध्ये एका महिलेने आपल्या पतीला सोडून एका जिहादी जाकीर हुसैन सोबत लग्न केले. आता हा पती त्या महिलेला मारहाण करतोय. कोलाजमध्ये पहिल्या फोटोत महिला एका पुरूषासोबत आहे. आणि दुसऱ्या फोटोत ती जखमी झालेली दिसत आहे. फोटोला याच दाव्याने अनेक फेसबुक युजर्संनी शेयर केले आहे. खरं काय आहे ? २०१२ मधील एका प्रकरणाला आता सोशल मीडियावर धार्मिक रंग देऊन शेयर केले जात आहे. हा फोटो काँग्रेसचे माजी आमदार रुमी नाथ यांचा आहे. ज्यांना आसामच्या करीमगंज मध्ये जमावाने मारहाण केली होती. जमावाने रुमीचा दुसरा पती जाकीरला मारहाण केली होती. रुमीने दुसरे लग्न केल्याने जमाव संतप्त होता. कशी केली पडताळणी ? फोटोच्या एका भागाला क्रॉप करून रिव्हर्स सर्च इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला रिझल्टमध्ये इंडिया टूडेचा २ जुलै २०१२ रोजीचा एक मिळाला. या व्हिडिओ सोबत दिलेली माहितीनुसार, रूम नाथ आणि तिच्या पतीला करीमगंजच्या हॉटेलमध्ये १०० हून अधिक लोकांनी मारहाण केली होती. यानंतर आम्ही कीवर्ड्स सर्च केल्यानंतर आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया वेबसाइट वर छापलेली पीटीआयची मिळाली. ही बातमी ३० जून २०१२ रोजीची होती. या बातमीनुसार, पहिल्या पतीला तलाक न देता जाकी जारीर नावाच्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न करणाऱ्या काँग्रेस आमदार रुमी नाथ आणि तिच्या पतीला जमावाने करीमगंजच्या एका हॉटेलात मारहाण केली. बातमीनुसार, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमाव दुसऱ्या लग्नामुळे संतप्त होता. घटनेवेळी रूमी नाथ गर्भवती होती. पडताळणी केल्यानंतर ही माहिती समोर आली की, रूमी नाथ आणि तिचे दुसरे पतीचा फोटो वापरून अनेकदा धार्मिक रंग देऊन फोटो शेयर करण्यात आलेले आहे. निष्कर्ष आसाममधील काँग्रेसच्या आमदार राहिलेल्या रूमी नाथ यांना जमावाने मारहाण केलेल्या फोटोला आता चुकीच्या दाव्याने शेयर केले जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z3w4bx