नवी दिल्लीः Realme ने गुरुवारी आपले लेटेस्ट हँडसेट्स आणि वरून पडदा हटवला आहे. ७ सीरीजचे हे लेटेस्ट हँडसेट्स ६५ वॉट फास्ट चार्जिंग आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियलमी ७ जगातील पहिला स्मार्टफोन आहे. जो सोबत लाँच करण्यात येणार आहे. रियलमी ७ सीरीज सुपर पॉवर सेविंग मोड सोबत येते. रियलमी इव्हेंटमध्ये रियलमी ७ सीरीज सोबत टूथब्रश, सूटकेस सोबत आणि टोट बॅग लाँच केले आहे. वाचाः वाचाः Realme 7, Realme 7 Pro: किंमत रियलमी ७ प्रोचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी ७ प्रो मिरर ब्लू आणि मिरर सिल्वर कलरमध्ये येतो. फोनचा पहिला सेल १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. हँडसेटला फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या इंडिया वेबसाइटवरून खरेदी करता येवू शकतो. हँडसेट लवकरच ऑफलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध केले जाणार आहे. वाचाः वाचाः रियलमी ७ चा ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी ७ मिस्ट व्हाइट आणि मिस्ट ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात येईल. याचा पहिला सेल १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोरवर होणार आहे. त्यानंतर हा फोन ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होणार आहे. Realme 7 Pro: ची वैशिष्ट्ये रियलमी ७ प्रो मध्ये फुल एचडी प्लस (1080x2400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. हँडसेटला ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये लाँच केला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा IMX682 प्राइमरी, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, २ मेगापिक्सल मोनोक्रोम आणि २ मेगापिक्सल मायक्रो सेन्सर दिला आहे. फोनचा रियर कॅमेरा स्टारी मोडी सपोर्ट करतो. म्हणजेच रात्री एकदम स्पष्ट क्लिक होईल. या फोनमध्ये नाईट व्हिडिओ मोड दिला आहे. AI कलर पोर्ट्रेट मोडचा सपोर्ट करतोच फोन मध्ये सेल्फी आणि विडियोसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमी ७ प्रोला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. 65 वाट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. फोन अवघ्या १५ मिनिटात बॅटरी शून्य ते ५८ टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः वाचाः Realme 7: चे वैशिष्ट्ये रियलमी ७ जगातील पहिला हँडसेट आहे. जो मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर सोबत येतो. कंपनीचा दावा आहे की, हा एक पॉवरफुल स्मार्टफोन आहे. ग्राफिक्स साठी माली G72 GPU दिला आहे. रियलमी ७ ला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा ३० वॉट डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ६५ मिनिटात बॅटरी शून ते १०० टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. 6.5 इंचाचा फुल एचडी+ (1080x2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आहे. फोनच्या बाजुला दिलेल्या पॉवर बटनात फिंगरप्रिंट सेन्सर इंटिग्रेटेड आहे. फोनला ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. रियलमी ७ मध्ये फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा सोनी IMX682 प्राइमरी कॅमेरा दिला आहे. स्टारी मोड नाइट स्केप , अल्ट्रा वाइड-ऐंगल विडियो सपॉर्ट करतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hXiVrV